5 राज्यांच्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले – जे.पी.नड्डा यांची भेट

आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट Union Minister of State Ramdas Athavale called on BJP National President JP Nadda on the backdrop of forthcoming Assembly elections in 5 states

नवी दिल्ली दि.24/06/2021 – येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तर प्रदेश,उत्तराखंड,पंजाब ,गोवा, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइं चे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर उपस्थित होते.

 आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश महत्वाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन युती केली पाहिजे.उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन चांगले आहे.उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे.मात्र आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे घ्यायचा आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरपीआयला भाजपने सोबत घ्यावे, भाजप - आरपीआय ची युती करावी तसेच अन्य राज्यांमध्येही आरपीआय चे युनिट मजबूत आहे. अन्य राज्यांमध्ये काही जागा भाजपने आरपीआय ला देऊन युती करावी.भाजपसोबत राष्ट्रीय पातळी वर आरपीआय ची युती मजबूत आहे.मात्र प्रदेश स्तरावर विधानसभा निवडणुकीत आरपीआय ला जागा देऊन युती करावी याबाबत ना.रामदास आठवले यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: