General news

माघ यात्रेत भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देणार – गहिनीनाथ महाराज औसेकर

माघ यात्रेत भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देणार

अन्नछत्रात रात्रीच्या भोजन प्रसादामध्ये चपाती व भाजीचा समावेश होणार

मंदिर समितीची बदनामी करणा-यांना कायदेशीर नोटीस बजावणार -गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.07 – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरची सभा आज रविवार, दिनांक 07 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरहू सभेत माघ यात्रेतील सोई-सुविधा, अन्नछत्रातील भोजनप्रसाद, मंदिर समितीची बदनामी करणा-यांना कायदेशीर नोटीस व इतर अनुषंगीक विषयांबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

माघ यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपूरात साजरी केली जाते. सन 2024 यावर्षी माघ एकादशी मंगळवार, दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 रोजी आहे.या यात्रेचा कालावधी माघ शुध्द ॥5 दि.14/02/2024 ते माघ शुध्द ॥ 15 (दि.26/02/2024) असा राहणार आहे. या यात्रेला अंदाजे 4 ते 5 लाख भविक पंढरपूर शहरात असतात.या यात्रा कालावधीतील श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या प्रथा व परंपरेचे जतन करून, भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरले.

सदरहू सभेस सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर,सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, शिवाजी मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून श्री. संत तुकाराम भवन येथे दैनंदिन दु.12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा दैनंदिन 2800 ते 3000 भाविक लाभ घेतात. त्यामध्ये दुपारी पोटभरून भोजन व रात्री खिचडी आमटी देण्यात येते.त्यामध्ये बदल करून रात्रीच्या भोजनप्रसादात दुपारच्या भोजन प्रसादाप्रमाणे चपाती, आमटी, भात व भाजी, केंव्हातरी गोड पदार्थ (एकादशीला शाबुदाणा खिचडी, भगर व आमटी) इत्यादीचा समावेश करण्याचे ठरले.

अयोध्या येथे दिनांक 22 जानेवारी, 2024 रोजी श्री रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत असून, त्या दिवशी श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास विद्युत रोषणाई, फुलांची आरास, अन्नछत्रात विशेष भोजनप्रसाद, रामजप तसेच अयोध्यातील कार्यक्रम पाहता यावा, यासाठी मंदिर व मंदिर परिसरात एलईडी स्क्रिन बसविण्यात येणार आहेत.

Ekam / sanskrit / cs music

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीबाबत समाजमाध्यमांमध्ये उलट-सुलट बातम्या छपाई / प्रसारित करून बदनामी करणा-या तसेच बदनामीकारक व्यक्तव्ये करणे व बाईट देणा-या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने नोटीस बजावणे तसेच माहे मे, 2023 ते जुलै, 2023 या महिन्याच्या जमा खर्चास मंजुरी, मंदिर समितीच्या दैनंदिन कामकाजासाठी व यात्रा-उत्सव कालावधीत आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिग पध्दतीने स्वयंसेवक नियुक्त करणेकामी ई निविदा राबविणे, मंदिर समितीच्या जमिनीतून उत्पन्न वाढवणेकामी विविध उपाय योजना राबवणे, भक्तनिवास येथील गाळ्यांचा ई लिलाव करणे, भक्तनिवासातील उपहारगृह मंदिर समिती मार्फत चालविणे किंवा चालविण्यास देणेकामी विहित प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *