डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे – शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे Caste wise census of OBCs should be done by certifying Dr. Babasaheb Ambedkar’s book – Founder President of Shivswarajya Yuva Sanghatana Sandeep Mutkule
पंढरपूर / नागेश आदापूरे - ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशी मागणी गेली कित्येक वर्षे सातत्याने होत आहे. त्याच धर्तीवर केंद्राकडे शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी जी जनगणना होणार आहे त्यामध्ये जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि त्यामध्ये देखील ओबीसींची काॅलम स्वतंत्ररित्या सामाविष्ट केला जावा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हु वेअर द शुद्राज या ग्रंथाचा दाखला देत जोपर्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाज आणि शासनाला देखील त्यांचे खरे प्रश्न समजणार नाहीत.त्यासाठी दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात, मागासवर्गीय,अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना यशस्वी होतील जेव्हा शेवटच्या रांगेमधला शेवटाचा नागरीक लाभार्थी होईल.तेव्हा ओबीसीं ची स्वतंत्र काॅलम स्वतंत्ररित्या जनगणना झाली असे समजले जाईल.त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. आता महाराष्ट्रातील विरोधी भाजपपक्ष ओबीसी राजकीय आरक्षण साठी चक्क जाम आंदोलन करणार आहेत.त्या सर्व नेत्यांनी केंद्रकडून पहिल्यांदा जनगणना करून घ्यावी मगच केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजपाने मराठा समाजाला पण ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे असेही शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी म्हटले आहे.
Like this:
Like Loading...