बळीराजा शेतकरी संघटना नूतन पदाधिकारी निवडी संपन्न

बळीराजा शेतकरी संघटना नूतन पदाधिकारी निवडी संपन्न Baliraja Shetkari Sanghatana elects new office bearers
    पंढरपूर / नागेश आदापूरे - केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर रेस्ट हाऊसला बळीराजा शेतकरी संघटनेच्या निवडी संपन्न झाली. 

   यावेळी बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी डॉ उन्मेश देशमुख,सोलापूर संपर्कप्रमुखपदी राजेंद्र सावळे,जिल्हा उपाध्यक्ष पदी रामदास खराडे व सर्जेराव शेळके, जिल्हा कार्यध्यक्षपदी डॉ.दिगंबर मोरे, जिल्हा संघटकपदी तानाजी सोनवले, माळशिरस तालुकाध्यक्षपदी तानाजी जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी रमेश लंगोटे, संपर्क प्रमुखपदी रणजित शिंदे अशा निवडी करण्यात आल्या . 

     यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केद्रींय अध्यक्ष पंजाबराव पाटील,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर ,सातारा जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, विश्वास जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले, रामेश्वर झांबरे, औदुंबर सुतार, दामाजी मोरे,विठ्ठल ढेकळे, दत्तात्रेय वरपे, जयवंत गायकवाड, धनंजय भोसले, मारुती बोरकडेंसह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: