राजकीय न्यूज

विधानसभा अध्यक्षांना योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी येवुदे.. पंढरपूरात ठाकरेंच्या युवासेनेने केली विठ्ठलाची महाआरती

विधानसभा अध्यक्षांना योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी येवुदे..पंढरपूरात ठाकरेंच्या युवासेनेने केली विठ्ठलाची महाआरती

ekam / sanskrit / cs music

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०१/२०२४ – आज आमदार अपात्रेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत.निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. निकालाच्या पाश्र्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.आज याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ठाकरेंच्या युवासेनेने विठ्ठलाची महाआरती केली आहे.

यावेळी बोलताना शिवसेना युवासेनेचे युवानेते रणजित बागल म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांकडून राज्यातील जनतेला सत्य निर्णयाची अपेक्षा आहे. राज्यात लोकशाही आहे का ? याचे भविष्य ठरवणारा आजचा निकाल आहे. विधानसभा अध्यक्षांनी योग्य व सत्य निकाल द्यावा ही सुबुद्धी देखील त्यांना मिळावी याकरिता आम्ही आज महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत भगवंत पांडुरंगाची महाआरती करत आहोत.

यावेळी शिवसेनेचे समन्वयक लंकेश बुराडे, युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, स्वप्निल गावडे,प्रणित पवार,प्रणव गायकवाड,हर्ष मोरे,गुरू बुराडे आदींसह शिवसैनिक व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *