राजकीय न्यूज

सहकार शिरोमणी कारखान्याच्या कामगार,ऊस तोडणी मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सहकार शिरोमणी कारखान्याच्या कामगार,ऊस तोडणी मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक मजुरांसाठी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

8 ते 10 जानेवारीपर्यंत झालेल्या या शिबिरात सुमारे 200 व्यक्तींनी याचा लाभ घेतला. या शिबिरात क्षयरोग तपासणी, रक्तदाब,रक्तातील साखर, स्त्रीरोग आदी तपासण्या करण्यात आल्या. राज्याचे साखर आयुक्त आणि सोलापूरचे प्रादेशिक सहसंचालक यांच्या कारखान्यास दिलेल्या परिपत्रकांन्वये कारखाना व्यवस्थापनाने हे आरोग्य शिबिर घेऊन त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. गळीत हंगाम काळात ऊस तोडणीसाठी बाहेरून येणाऱ्या महिला व स्त्री मजुरांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने नेहमीच प्राधान्य दिलेले असून या शिबिरामुळे कारखान्यातील अधिकारी,कर्मचारी, ऊस तोडणी मजूर यांना चांगल्या आरोग्यासाठी दिलासा मिळाला आहे.

या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.सौ.रेपाळ यांचा सत्कार असिस्टंट सिव्हिल इंजिनियर प्रतीक्षा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक सुरेश देठे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळमकर, उपशेती अधिकारी प्रतापराव थोरात, ऊस पुरवठा अधिकारी हरिभाऊ गिड्डे, बंडू पवार उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.रेपाळ, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सावरे, आरोग्य सेविका सौ.काळे, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी श्री माळी, श्रीमती मायणीकर व आशा इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *