श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्ती साठी श्रीकांत शिंदेंची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी Shrikant Shinde Demands NCP Leaders for Appointment as Member of Shri Vitthal Rukmini Temple Committee

पंढरपूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य अडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे . त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मी आपल्या पक्षाचा एक कार्यकर्ता असून आपण मला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिवपद दिले आहे आणि त्यातून मी पूर्णवेळ पक्षकार्य करीत आहे.पक्षाच्या पडत्या काळात विविध कार्यक्रम आयोजित करत पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे आणि महादेव कोळी समाजाचे एकमेव पदाधिकारी आहेत की जो पक्ष स्थापनेपासून सक्रियपणे काम करत आहे. सध्या वरिष्ठ पातळीवरून सर्वच बाबतीतून श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे.

  मंदिर समितीवर महादेव कोळी समाजासाठी एक जागा देण्यात येते.सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचा मी एकमेव पदाधिकारी महादेव कोळी समाजाचा आहे.पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्यपदी नियुक्त मिळालेस मला पक्ष कार्य करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल. तरी माझी सदस्यपदी नियुक्ती करावी अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: