गोफण – वास्तवाचे भान
गोफण........
जे मैफीलीत आले ते
स्वतःला विसरून गेले !!
ज्यांनी पेल्यावर पेले रिते केले
ते पशूतूल्य वागू लागले!!
पिताना ते सर्वाना लाजवू लागले
हरपून शुद्ध डरकाळ्या फोडू लागले !!
घरी जाताच घर अनोळखी झाले
रात्र बाहेरच काढून ऊपरे झाले !!
सकाळ होताच लाजुनी घरी आले
कुटुंबास पहाताच नशा मुक्त झाले !!
वास्तवाचे भान
माणूस ठरवतो एक
अन घडते वेगळेच
कोण म्हणते दैवयोग ,
कोण म्हणते पूर्वकर्म ,
पण कारणाशिवाय कांहीच घडत नसते
हे मात्र खरे असते
हे समजण्यासाठीच ज्ञानाचीच गरज लागते !!
सुप्रभात
“ज्ञानाची प्रचीती घेतल्याशिवाय अनुभव ,कौशल्य अन प्रज्ञा समृद्ध होत नाही “!!
आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००
