सामुहिक कारवाईचे यश,कुर्डूवाडीची कोरोनातून मुक्ती

सामुहिक कारवाईचे यश,कुर्डूवाडीची कोरोनातून मुक्ती Success of collective action, liberation of Kurduwadi from Corona
 कुर्डूवाडी /राहुल धोका - कुर्डूवाडी शहरात १५ दिवसात केवळ एक व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला असून सात दिवसात एकही व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला नाही. ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रुग्ण आहेत हे लक्षात घेवून कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी अचूक करावाईस सुरवात केली व शहराची नाकेबंदी करत शहरात विना मास्क फिरणाऱ्या व नियम न पाळता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर दंड स्वरुपात करावाई सुरु केली. नियमित कारवाईत दंडाची वसुली ही होत गेली आणि कोरोना ही कुर्डूवाडीतून पळाला आहे. दि.२७ व २८ या दोन दिवसात १२ हजार दोनशे रुपये दंड वसूल केला आहे.अशी कारवाई नियमित चालू आहे. दोन दिवसात विनामास्क १० व्यक्तींना ५ हजार तर सोशल डीस्टन्स न पाळणाऱ्या ४९ व्यक्तींना ४ हजार नऊशे तर एम.व्ही.अक्ट अंतर्गत ही दंड वसूल केला आहे. 

त्याच्या जोडीस ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षक डॉ.सुनंदा रणदिवे यांचे धोरण ही प्रभावी ठरले असून नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालय यांचेकडून नियमित कोरोना तपासणी व लसीकरण तसेच नगरपालिकेकडून आरोग्य निरीक्षक एकाकी झुंज देत आहेत. वरिष्ठ सुटीवर असताना ही पायगण कोरोना संपवण्याची धुरा वाहत आहेत.विशेष विना कारण कुर्डुवाडीत रुग्ण नसताना रुग्ण आहे असे सांगितले कि मग पायगण यांना सत्य समोर आणावे लागते.शहरातील कोरोनावर काम करणारे डॉक्टर,स्थानिक नागरिकांची जागरूकता यामुळे गेल्या १५ दिवसापासून तरी कोरोना कुर्डूवाडीतून संपला आहे असेच म्हणावे लागेल.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: