दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापुर जैन बोर्डिंगमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती

दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापुर येथील जैन बोर्डिंगमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj at Jain Boarding of South India Jain Sabha at Kolhapur Anniversary celebration
  कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराजांनी समाजा तील सर्व घटकांना सोबत घेत विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले. सन १८९४ ते १९२२ पर्यंत कोल्हापूरच्या प्रशासनातील त्यांच्या अदभूत कार्यामुळे त्यांना लोकनेता म्हणुन ओळखले गेले . त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी धरण बांधले, विविध खेळात आणि शिक्षण क्षेत्रातील कार्य  अतुलनीय आहे. वेगळ्या जाती धर्मासाठी त्यांनी वसतिगृहे उभारली. मानवता धर्म हा विचार त्यांनी पुढे रूढ केला. खऱ्या अर्थाने क्रांतिकारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी कार्य केले.अशा या महान छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची

जयंती दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापुर येथील जैन बोर्डिंगमध्ये साजरी करण्यात आली.

   छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे खजिनदार संजय शेटे, दिगंबर जैन बोर्डिंग चेअरमन सुरेश रोटे सकाळचे निवासी संपादक निखिल पंडीतराव, व्हाईट आर्मी चे अशोक रोकडे व बोर्डिंग चे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: