कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आदरांजली

कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आदरांजली Tribute on behalf of Swabhimani Shetkari Sanghatana on occasion of death anniversary of late Audumbar Anna Patil

पंढरपूर – पंढरपूर तालुक्याच्या कृषी,औद्योगिक क्रांतीचे जनक कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अण्णांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला .

    पंढरपूर तालुक्यातील कोणतीही निवडणूक अण्णांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होत नाही.असा कर्तृत्ववान माणुस आपल्यातून गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्याला कळते,आज ही सर्वजण बोलताना सहज बोलून जातात आण्णांच्या काळात आम्हाला एवढं व्याज बील मिळत होते, कारखाना असा चालत होता, बिल वेळेत मिळत होते, ऊस वेळेत जात होता, कारखाना शिलकीत होता मात्र चुकीच्या लोकांच्या हाती नेतृत्व गेल्या नंतर संस्था लयास जाते,कामगार, शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त होत आहेत मग गणित चुकले कुठे तर योग्य वेळी जर शेतकऱ्यांनी योग्य माणसाच्या हातात संस्था दिली असती तर आज ही वेळ आली नसती. शेतकरी-कामगार व सर्व संस्थेच्या हितचिंतकांनी भविष्यात वाटचाल करत असताना योग्य वेळी योग्य नेतृत्व निर्माण करुन आपली संस्था चालवली आणि टिकवली पाहिजे. चळवळीत काम करताना शेतकऱ्यांची पिळवणूक करणार्या साखर सम्राटांशी संघर्ष करताना अण्णांचे विचार आम्हाला कायम ऊर्जा देतात असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील यांनी केले. 

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, रायाप्पा हळणवर,स्वाभिमानी युवाचे राज्य प्रवक्ते रणजित बागल,देवा साळुंखे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: