माजी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा आमदार प्रशांत परिचारकांचे हस्ते सत्कार

माजी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा आमदार प्रशांत परिचारकांचे हस्ते सत्कार Former Chief officer Aniket Manorkar and new Chief officer Arvind Mali felicitated by MLA Prashant Paricharak
 पंढरपूर,28/06/2021/ नागेश आदापूरे  - पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

 पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने  अभ्यासू व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची उपायुक्त नगरपालिका प्रशासन संचालनालय, वरळी मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाली. त्यानिमित्ताने निरोप समारंभ व पंढरपूर नगरपरिषदचे नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी  यांचा स्वागत समारंभ आमदार प्रशांत परिचारक  यांचे शुभहस्ते नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षा सौ श्वेताताई निलराज डोंबे,पक्षनेते अनिल अभंगराव , गुरुदास अभ्यंकर,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,वामन बंदपट्टे, विक्रम शिरसट,संजय निंबाळकर, राजू सर्वगोड, विवेक परदेशी, इब्राहिम बोहरी,विजय वरपे, माजी नगरसेवक नीलराज डोंबे,कृष्णा वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट,बसवेश्वर देवमारे,तम्मा घोडके, अमोल डोके यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, विवेक परदेशी,अनिल अभंगराव,रवींद्र वाघमारे,अभिलाषा नेरे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे,जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे ,उपाध्यक्ष संतोष सर्वगोड ,जयंत पवार ,किशोर खिलारे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल वाळुजकर यांनी केले. स्वागत महादेव आदापुरे यांनी तर आभार शरद वाघमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: