सामाजिक न्यूज

आपल्या संबंधात अंतर येवू नये यासाठी प्रयत्न करा

एक मैत्रिण अनिताने दुसरी मैत्रिण नमिताला विचारले: मुलाच्या जन्मानिमित्त तुझ्या पतीने तुला कोणती भेट दिली?
नमिता म्हणाली – काही नाही
मैत्रिण अनिताने प्रश्नार्थक विचारले की, ही चांगली गोष्ट आहे का ?त्याच्या नजरेत तुला काहीच किंमत नाही का ?

शब्दांचा हा विषारी बॉम्ब टाकल्यावर ती मैत्रिण अनिता दुसरी मैत्रिणी नमिताला त्याच विचारात सोडून निघून गेली.

सायंकाळी नमिताचा पती घरी आला असता पत्नी नमिता तोंड लटकवलेल्या अवस्थेत दिसली.

त्यांची त्या भेट देण्याविषयी चर्चा झाली. शब्दांनी शब्द वाढत गेला.वाद वाढत गेला आणि त्यानंतर त्यांचे जोरदार भांडण झाले.एकमेकांना शिव्याशाप दिले.दोघांमध्ये हाणामारी झाली आणि अखेर पती-पत्नींनी घटस्फोट घेण्यापर्यंत वाद वाढला.

ही समस्या कोठून निर्माण झाली हे माहिती आहे का ? तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेल्या मैत्रिणीने म्हटलेले ते फालतू वाक्य.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपले आपापसातील संबंध बिघडू नयेत म्हणून काळजी घ्या. आपल्या संबंधात अंतर येवू नये यासाठी प्रयत्न करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *