सादिक खाटीक यांना आमदार करण्यासाठी जयंत पाटलांना साकडे घालणार – सुशांत देवकर , आनंदरावबापु पाटील
सादिक खाटीक यांना आमदार करण्यासाठी जयंत पाटलांना साकडे घालणार – सुशांत देवकर , आनंदरावबापु पाटील Jayant Patil to be made MLA to make Sadiq Khatik MLA – Sushant Deokar, Anandrao Bapu Patil

आटपाडी,प्रतिनिधी – जयंत पाटील हेच आपला पक्ष,हाच आपला नेता असे मानून निष्ठेने काम करणाऱ्या सादिक खाटीक यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली जावी अथवा राज्या तल्या उपेक्षितांना न्याय देता येईल अशा ताकदीच्या महामंडळावर संधी द्या म्हणून मंत्री जयंत पाटील यांना आम्ही साकडे घालणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर आणि मतदार संघाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील यांनी सांगितले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांना ऑल जर्नालिस्ट अँन्ड फ्रेंडस सर्कल या पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांचा फेटा बांधुन शाल पुष्पगुच्छ देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव बापू पाटील, सुशांत देवकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला . त्यावेळी या मान्यवर द्वयांनी वरील उदगार काढले.
भिंगेवाडी जवळील माणगंगा फळबाग संघाच्या कृषी विद्यालय आटपाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
मतदार संघात सदाशिव पाटील, जिल्हयात राज्यात जयंत पाटील आणि देशपातळीवर शरद पवार यांचा आदर्श समोर ठेवून खानापूर आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादीमय करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत . पंतप्रधानपदी शरद पवार आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंत पाटील विराजमान झाले पाहिजेत हेच आपणा सर्वांचे स्वप्न असले पाहिजे असे सुशांत देवकर,आनंदराव बापु पाटील यांनी मत व्यक्त केले .
पत्रकारीतेची कसलीही नशा डोक्यात न जावू देता कृषी,समाजकारण,साहित्य,सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम केले.सर्वांचेच जीवन असणाऱ्या पाण्यासाठी मोठे योगदान दिले.हा सत्कार उर्वरीत आयुष्यात प्रेरकच ठरेल ,अशा भावना सादिक खाटीक यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या .
त्यांच्या कार्य कर्तृत्वाला साजेलसा बहुमान आपल्या नेत्यांकडून ,पक्षाकडून होण्यासाठी आनंदरावबापू, सुशांतजीनी प्रयत्न करावेत अशा भावना राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजय पुजारी यांनी स्वागत प्रास्ताविक करताना व्यक्त केल्या .
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर, तालुका उपाध्यक्ष शशिकांत भोसले,महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौ.अश्विनीताई अष्टेकर - कासार,जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. सुजाताताई टिंगरे,राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, प्रा .योगेश सरगर आदींची सादिक खाटीक यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देणारी भाषणे झाली .
यावेळी कृषी विद्यालयाचे प्राचार्य विशाल यादव, नेलकरंजीचे किशोर पाटील, डॉ. सदाशिव वाघमारे,सुहास पाटील,बाबुराव भोरे आदी उपस्थित होते . प्रा.योगेश सरगर यांनी आभार मानले .