शेतात पत्रा शेड मारण्यासाठी आणलेल्या सामानाची चोरी करणारा अटकेत

शेतात पत्रा शेड मारण्यासाठी आणलेल्या सामानाची चोरी करणारा अटकेत Arrested for stealing goods brought to kill a letter shed in a field

पंढरपूर – पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कौठाळी ता.पंढरपुर येथील विजयसिंह पवार यांचे शेतात पत्रा शेड मारण्यासाठी किमंत रुपये 45,000 / – चे 30 नग पत्रे व 20 नग लोंखडी अँगल व इतर साहीत्य असे त्यांनी त्याचे शेतातील मोकळ्या जागेत ठेवले होते .सदरचे लोंखडी पत्रे , अँगल व इतर साहीत्य दि .01 / 06 / 2021 रोजी सांयकाळी 05/00 ते दि . 02/06/2021 रोजी सकाळी 08/00 वा दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत विजयसिंह पवार यांचा शेतगडी साहेबराव महादेव नागटिळक रा.कौठाळी ता.पंढरपुर याने दि .09/06/2021 रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा तपास स.पो.फौ. मारुती दिवसे हे करीत होते .

   सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम याचे मार्गदर्शना खाली व प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे याचे नेतृत्वात तपास स.पो.फौ. मारुती दिवसे,पो.ना. सुभाष शेंडगे, पो.ना.सय्यद ,पो.कॉ. काळे हे करत असताना त्यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की,संशयीत दादासाहेब बाळासाहेब शिंदे, वय 23 रा .वाखरी ता.पंढरपुर याने चोरीस गेलेले पत्रे व अँगल चोरले असल्याचे समजले . त्यास वरील पथकातील अंमलदार यांनी चौकशी करीता ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस करता प्रथम त्याने उडवाउडविची उत्तरे दिली.त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता सदरची चोरी त्यानेच केल्याचे कबुल करुन गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल पैकी किमंत रुपये 23180 / - चा 20 नग पत्रे ,10 लोखडी अँगल असा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे . 

     सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपुर याचे न्यायालयात हजर केले असता त्यास दि .29/06/ 2021 रोजी पर्यत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.सदरची कामगिरी विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी , पंढरपुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली व प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे याचे नेतृत्वात स.पो.फौ.मारुती दिवसे,पो.ना.सुभाष शेंडगे, पो.ना.सय्यद,पो.कॉ.काळे हे करीत आहेत . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: