मंगळवेढा तालुक्यांमध्ये अभ्यासिकेच्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून काम करणार – शैलेश आवताडे

आंधळगाव येथे स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे उद्घाटन
पंढरपूर /नागेश आदापूरे - नवनिर्माण बहुउद्देशिय सामाजिक संस्था संचलित, स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा उद्घाटन समारंभ दि २०/१/२०२२ रोजी  आंधळगाव ता.मंगळवेढा येथे उद्योजक शैलेश बबनराव आवताडे आणि ॲड. सुषमा माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना शैलेश आवताडे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अभ्यासिकेची सोय होणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात मंगळवेढा तालुक्यांमध्ये अभ्यासिकेच्या आणखीन सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून काम करणार आहे .

    प्राध्यापक बलभिम लवटे सर म्हणाले की फार कष्टामधून माने बहिण भावांनी आंधळगावला एमपीएससी- यूपीएससी चा अभ्यास करण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी म्हणून ही अभ्यासिकेची सुविधा निर्माण केली .त्यांच्या ह्या कार्याला ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे त्यांनी येणाऱ्या काळात आणखीन ताकद द्यावी.चंद्रशेखर पाटील यांनी अभ्यासिके साठी एमपीएससी आणि यूपीएससी ची दहा पुस्तके भेट म्हणून दिली. दामाजी शुगरचे माजी संचालक पांडुरंग भाकरे यांनी येणाऱ्या काळामध्ये अभ्यासिकेचे साठी लागेल ती मदत देणार असल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी नवनिर्माण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष माने, प्रा.महादेव ढोणे,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नागणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी आंधळगावचे उद्योजक दिगंबर भाकरे, आंधळगावचे ग्रामपंचायत सदस्य अंकुश डांगे, मधुकर पवार, पत्रकार प्रशांत माळी,करण शिंदे, सुहास लेंडवे सर,जितेंद्र पाटील, प्रवीण लेंडवे,गणपत भाकरे, संतोष सुरवसे, भिकाजी लेंडवे, अवताडे सर ,वेळापूरे सर आदि उपस्थित होते. आभार प्रदर्शन अभिनंदन लेंडवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: