पिडीत महिलेने समाधान नाना सुरवसे याचेविरुध्द दिली विनयभंग केल्याची फिर्याद

पिडीत महिलेने समाधान नाना सुरवसे याचे विरुध्द दिली विनयभंग केल्याची फिर्याद The victim filed a complaint against Samadhan Nana Survase for molestation

पंढरपूर / प्रतिनिधी – पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील भंडीशेगाव ता.पंढरपुर येथील समाधान नाना सुरवसे (अध्यक्ष छावा क्षात्रविर सेना ) रा.भंडीशेगाव ता.पंढरपुर हा भंडीशेगाव येथील राहणारी महिल (महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे) हिस तुमचे पालखी महामार्गामध्ये गेलेल्या शेतीचे पैसे लवकर मिळवुन देतो म्हणुन तिचे नवर्‍यासोबत मैत्री करुन घरी जावून वरील पिडीत महिलेशी ओळख करुन घेवून तिचा मोबाईल नंबर घेवून तिचा नवरा घरी नसताना तिचे घरी जावुन तिचेशी सलगी करण्याचा प्रयत्न करीत होता व मोबाईलवरुन फोन करुन तु मला खुप आवडतेस, तुच्यावर माझे प्रेम आहे असे म्हणून तिला वेळोवेळी त्रास देत असल्याने तिने त्याचा मोबाईल ब्लॅक लिस्टला टाकुन ब्लॉक केला होता.

     त्यानंतर दि.10/06/2021 रोजी पिडीत महिला ही एकटी घरी असताना यातील आरोपी हा तिचे घरी जावुन तु माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केला असे म्हणून तिचा विनयभंग करुन तिला तु जर माझेशी प्रेम संबंध ठेवले नाही तर मी तुझी गावात बदनामी करेन असे म्हणून शिवीगाळी करुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे .

     त्यानंतरही सदर पिडीत महिलेने भितीपोटी घरातील लोकांना घडला प्रकार सांगितला नाही . तो पिडीत ही इतरत्र कामाकरीता बाहेर गेली असता तिचा पाठलाग करीत होता व मोबाईलवर फोन करुन छेडछाड करु लागल्याने दि.28/06 / 2021 रोजी पती सोबत पोलीस ठाणेस येवून पिडीत महिलेने समाधान नाना सुरवसे रा . भंडीशेगाव ता.पंढरपुर याचे विरुध्द फिर्याद दिल्याने इकडील पोलीस ठाणेस गु.र.नं 256 12021 भा.द.वि.कलम 452,354 ,354 (अ)( O (एक)(दोन),354 (ड),500, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

   या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर विभाग पंढरपुर व पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.शेख हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: