गणपती बाप्पा उंचीच्या बंधनात अडकले

मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर

शेळवे (संभाजी वाघुले) – संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत.The rules for the Ganeshotsav have been announced राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेश मूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.

    करोनाची दुसरी लाट ओसरत असली,तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली मात्र, यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी घेतलेली असल्याने या नियमावलीवर काय प्रतिक्रिया उमटतात हे लवकरच दिसू शकते.

गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
१) गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
२) कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
३) सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
४) विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
५) नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
६) शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
७) सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
८ आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
९) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, वेबसाईट , केबल नेटवर्किंग,फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
१०) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: