कृषी विभागाचा रब्बी हंगामातील पुरस्कारात भोसे येथील ॲड.गणेश पाटील यांना दुसरा क्रमांक
कृषी विभागाचा रब्बी हंगामातील पुरस्कारात भोसे येथील ॲड.गणेश पाटील यांना दुसरा क्रमांक Adv. Ganesh Patil from Bhose came second in Rabbi season award of the Department of Agriculture
पंढरपूर/ विजय काळे – महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत सन 2020-21 मध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटावे म्हणून शासनातर्फे रब्बी हंगाम पीक स्पर्धा राज्य ,जिल्हा, तालुका स्तरावर घेण्यात आली यामध्ये तालुका स्तर या घटकामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे (क) येथील शेतकरी ॲड गणेश दादा पाटील यांनी हरभरा पिकामध्ये 18.75 क्विंटल एवढे उत्पादन घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. त्याबद्दल पंचायत समिती पंढरपूर येथे कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी तळेकर व तालुका कृषी अधिकारी पवार यांचे हस्ते ॲड गणेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती अर्चना व्हरगर ,गट विकास अधिकारी रविकिरण घोडके तसेच कृषी विभागातील अधिकारी ,पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी सहाय्यक धनराज खोत यांचे मार्गदर्शना खाली जॕकी ९२१८ या सुधारीत जातीच्या वाणाची पेरणी करून हेक्टरी १८.७५ क्विंटल उत्पादन घेतले.किडीचा प्रसार रोखण्यासाठी कामगंध सापळे लावण्यात आले.यामुळे किड रोखली जावून उत्पादन वाढण्यास मदत झाली,अशी माहिती ॲड.पाटील यांनी दिली.