नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी


हायलाइट्स:

  • अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आमदार नितेश राणे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव.
  • राणे यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर २७ तारखेला होणार सुनावणी.
  • सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, २७ जानेवारी रोजी प्राथमिक सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे. (pre arrest bail application by mla nitesh rane will be heard in the supreme court tomorrow)

परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात कणकवली पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. नितेश राणे व त्यांचे साथीदार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी अटकेच्या भीतीने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने ३० डिसेंबर रोजी फेटाळल्यानंतर दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयानेही १७ जानेवारी रोजी त्यांचा अर्ज फेटाळला. त्यावेळी २७ जानेवारीपर्यंत दोघांवर अटकेसारखी कठोर कारवाई होणार नाही, अशी हमी पोलिसांतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा- ‘झोंबिवली’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार

आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्या प्रकरणी चौकशी करिता आमदार नितेश राणे मंगळवारी दुपारी कणकवली पोलिस स्टेशनला उपस्थित राहिले. संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- सायरस पूनावालांना पद्मभूषण; शरद पवारांना वाटला अभिमान; केले खास अभिनंदन
क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! राज्यात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ, मृत्यूही वाढलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: