सामाजिक न्यूज

पंढरपुरात गरजवंत बालकांना स्वेटरचे वाटप आयू फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पंढरपुरात गरजवंत बालकांना स्वेटरचे वाटप आयू फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२४ – समाजामध्ये काम करीत असताना आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांला मदत करणे ही आपले कर्तव्य आहे याच जाणिवेतून पंढरपुरात आयू फौंडेशन यांच्या वतीने स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम राबवत आयू फाऊंडेशनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पंढरपूरमध्ये योगेश बडवे,संतोष चौंडवार, विठ्ठल भोसले,ओंकार ओकरे, युवराज नवले यांच्यामाध्यमातून आयू फाऊंडेशनच्यावतीने मतिमंद विद्यालय,नवजीवन निवासी अपंग शाळा व लेबर वसाहतमधील गरजवंत बालकांना स्वेटर वाटप कार्यक्रम ह.भ.प विनय महाराज बडवे,माजी नगरसेवक शामराव पाटोळे यांच्या हस्ते आणि रा.पां. कटेकर,सौ.बडवे मॅडम,कवडे सर,थोरात सर, आयरे सर तसेच दोन्ही शाळेंमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांचे सहकार्य लाभले.त्यांनी या फाऊंडेशनच्या पुढील कार्यास सदिच्छा दिल्या.

कोरोना काळात सगळीकडे जे भयानक वातावरण झाले होते, लोकांचे होत असलेले हाल पाहून आपण पुढे येऊन या गरजू लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, आपणही या समाजाचे काहीतरी देण लागतो ही भावना मनात घेऊन सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या तेजश्री कुलकर्णी व तुषार कुलकर्णी या बहीण भावाने गरजवंत बालकांसाठी जमेल तशी मदत करण्यास सुरुवात केली. त्यांचे हे कार्य बघून पुण्यामधील अजून काही सहकारी त्यांच्या या कामात सहभागी झाले.कोरोना काळापासून त्यांचे हे काम अविरत सुरु होते पण हे काम एक ग्रुप म्हणून करत होते व त्या कार्याला मर्यादा येत होत्या म्हणून मागील वर्षी या सर्वांनी मिळून एम.सी.ए अंडर आयु फाऊंडेशनची स्थापना केली.

फाऊंडेशनची स्थापना झाल्यापासून एकच वर्षात या फाऊंडेशनच्या माध्यमातून 1500 पेक्षा अधिक गरजवंत बालकांना शैक्षणिक साहित्य, कपडे व इतर आवश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले असून 2030 पर्यंत 1 लाख गरजवंत बालकांपर्यंत मदत पोहचण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आयू फाऊंडेशनची व्याप्ती वाढवून फक्त पुण्यामध्ये याचे काम न ठेवता इतर जिल्ह्यामध्ये पण या फौंडेशनच्या माध्यमातून केले पाहिजे या भावनेमधून पुण्याबाहेर पडत विठूरायाच्या पंढरीनगरी मध्ये स्वेटर वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून फाऊंडेशनच्या कामाला सुरवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *