General news

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन, हुतात्मा दिन साजरा

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन, हुतात्मा दिन साजरा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०१/२०२४ – पंढरपूर येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) तसेच हुतात्मा दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर तर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एच आर वाघमारे सर हे होते.

प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर म्हणाले की,राजमाता जिजाऊ या एक आदर्श नारी होत्या व प्रेरणा देणाऱ्या माता होत्या. स्वामी विवेकानंदांचे चरित्र सांगत असताना आशेचा किरण ठेवा निराश होऊ नका. तरुण सबळ, व्यसनमुक्त आणि आत्मविश्वास असलेला पाहिजे.ग्रंथाशी मैत्री करा. पुस्तके ज्ञान पुरवतात तर सोशल मीडिया फक्त माहिती पुरवतो असा संदेश त्यांनी दिला.

ekam / sanskrit /cs music

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्री वाघमारे सर यांनी पाहुण्यांच्या वक्तृत्व शैलीचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासारखी वक्तृत्व कला संपादित करावी असे आवाहन केले. राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेऊन राजमाता जिजाऊ होण्याचा प्रयत्न करा व शिवाजी घडवण्याचा प्रयत्न करा असे सांगितले.

ओम कोरे,दिव्या यादव,वैष्णवी जाधव, शिवानी नरसूडे,सोनाली मदने आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तोडमिसे व कुमारी गायकवाड यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची व अध्यक्षांची ओळख स्नेहल चंदनशिवे यांनी करून दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी धनश्री घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कुमारी कशिश खतीब यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी छात्राध्यापिका कुंभार, कोकाटे, चौगुले, कांबळे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी श्री गंगथडे सर व श्री जाधव सर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *