Live Radio

संत शिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊली Dnyaneswr mauli प्रस्थान सोहळ्या प्रसंगी डॉ.नीलमताई गो-हे यांनी माऊलींच्या संजीवन समाधीस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना…
      आळंदी दि.०२ : आषाढी ashadhi vari व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अभिन्न अंग असून शेकडो वर्ष पंढरपूरच्या वारीचे लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे.आज संतशिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे Nilamtai Gorhe यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण करत महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन आणि वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी अशी प्रार्थना माऊली चरणी  केली. 

    महाराष्ट्रातील तमाम जनता अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार हा देखील विठ्ठल भक्त आहे.आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते असून  वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.मंदिर परिसरातील सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या. यावेळी अन्नदानासाठी देणगी ना.डॉ.गोऱ्हे यांनी दिली.  

 सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रार्दुभाव वाढला होता त्यावेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत उध्दव ठाकरे उत्तम सरकार चालवत असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. 

 याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे सीईओ अंकुश जाधव,आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई,सोहळा प्रमुख विकास ढगे,माजी जिल्हा प्रमुख राम गावडे,नगरसेविका शैला अविनाश तापकिर,शहरप्रमुख अविनाश तापकिर, विजयताई शिंदे,मंगलताई सोनवणे,उपशहर प्रमुख आनंद गोयल,पोलिस निरीक्षक मोहन यादव, उपनिरीक्षक श्री जोंधळे,तम्मा विटकर,युवराज शिंगाडे आदी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *