स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सोलापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्य़ातील अनेक कारखानदारांनी मागील गळीत हंगामाची एफआरपीची FRP रक्कम अद्यापही दिलेली नाही.यंदाचा गळित हंगाम तोंडावर आला तरीही अद्याप मागच्याच हंगामाची देणी देण्यात आलेली नाहीत.वारंवार आंदोलने करूनही कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आलेली नाही केली ती फक्त कागदोपत्री आहे. तरी तात्काळ कारखानदारांवर कारवाई करून थकीत रक्कम असणार्या कारखान्याचे चेअरमन सह संपुर्ण संचालक मंडळ निलंबित करून त्या कारखान्यांवर तुकाराम मुंढे यांना प्रशासक म्हणुन नेमावे आदी मागण्या आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल,जिल्हाध्यक्ष तानाजी बागल ,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे ,जिल्हा संघटक शहाजहान शेख, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मोहोळ तालुकाध्यक्ष पप्पू पाटील आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.