पंढरपूरमध्ये पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर

पंढरपूरमध्ये पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर State level fitness aerobics camp at Pantnagar Fitness Center in Pandharpur

पंढरपूर, विजय काळे – सोलापूर शहर व जिल्हा स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशन व महाराष्ट्र स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने दि. 22 जुन ते 25 जुन रोजी पंढरपूरमध्ये पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर पार पडले. फिटनेस एरोबीक्स म्हणजे संगीताच्या तालावर तालबध्द नियमानुसार केलेला व्यायाम प्रकार आहे. सदर खेळ हा चार प्रकारामध्ये शिकवला जातो. स्पोर्टस एरोबीक्स, फिटनेस एरोबीक्स, स्टेप एरोबीक्स, हिप हॉप एरोबीक्स या चार प्रकारात शिकवला जातो. एरोबीक्स हा खेळ जागतीक पातळीवर खेळ म्हणून 1996 पासून खेळला जातो. एरोबीक्स हा खेळ भारतात सन 2001 पासून राष्ट्रीय महासंघाकडून सुरू करण्यात आला आहे.

  एरोबीक्स खेळामुळे शरीराचे वजन कमी होते. शारीराला ऑक्सिजनचा पुरवठा नियमीत होतो. ह्रदयाची स्पंदने व्यवस्थीत होतात.एरोबीक्स खेळाला भारतात सी.बी.एस.ई.बोर्ड व महाराष्ट्र राज्य बोर्ड शालेय महासंघाची मान्यता असून एरोबीक्स खेळाडुंना सर्व शासनाच्या सवलतीचा लाभ मिळतो. सदर राज्यस्तरीय शिबीरास राष्ट्रीय एरोबीक्स संघटनेचे सचिव संतोष खैरनार ,आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक सुरैय्या खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. 

  या राज्यस्तरीय शिबीरात सोलापूर जिल्ह्यातून बावन्न कोचेसनी सहभाग नोंदविला . सदर राज्यस्तरीय शिबीरात एरोबीक्स कोच म्हणून विशाल दळवी, संग्राम गायकवाड यांनी यश प्राप्त केले. जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक उमेश परिचारक यांनी त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये एरोबीक्स खेळाचा प्रसार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा चित्रा गायकवाड, जिल्हा संघटनेचे सचिव सुधाकर गायकवाड यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: