राजकीय न्यूज

उपोषण कामगारांचे आश्वासन मनसेचे

उपोषण कामगारांचे आश्वासन मनसेचे

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप– ९७६८४२५७५७

मुंबई : ॲक्सिस बँक संयुक्त कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी दि.१ जानेवारी २०२४ पासून येथील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे व शैलेश पाटणकर यांनी भेट दिली.

या भेटीवेळी कामगारांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या व मागण्या समजून घेण्यात आल्या.लवकरच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ॲक्सिस बँकेला चर्चेसाठी तयार करू आणि तुमच्या शिष्टमंडळाला सोबत घेवून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घडवून आणू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *