सामाजिक न्यूज

महावीर फाउंडेशन पंढरपूर च्या वतीने पंढरपूरात प्रथमच शीत शव पेटी आणि रुग्ण सेवा साहित्य उपलब्ध

महावीर फाउंडेशन पंढरपूर च्यावतीने पंढरपूरात प्रथमच शीत शव पेटी आणि रुग्ण सेवा साहित्य उपलब्ध

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१३/०१/२०२४ – महावीर फाउंडेशन, पंढरपूर च्या वतीने पंढरपूरकरांसाठी एक नविन उपक्रम सुरू करण्यात येत आहे.पंढरपूरात प्रथमच शीत शव पेटी (Dead Body Freezer Box) आणि रुग्ण सेवा साहित्य उपलब्ध करण्यात आहे .

ही सेवा रविवार दि १४ जानेवारी २०२४ पासुन स्व.सागर राजेंद्र दोशी यांचे स्मृती प्रित्यार्थ सुरुवात करण्यात येत आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती अमोल अरुण मोदी, सुयोग प्रविण शहा, मनोज विजयकुमार दोशी, धिरज रमनलाल दोशी,श्रीकांत महावीर खडके, समीर सुरेंद्र दोशी,राजेश शांतीलाल शहा, सोनीक देशभुषण कोठारी,निश्चल विपिनचंद्र शहा, सुदेश विजय व्होरा,संतोष जिवराज शहा, प्रमोद जिवंधर शहा,राजेंद्र कस्तुरचंद दोशी महावीर फाउडेशन, पंढरपूर च्यावतीने करण्यात आले आहे.

दि.१४ जानेवरी २०२४ सायंकाळी ५ ते ८ यावेळी महालक्ष्मी फर्निचर लिंक रोड,पंढरपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.यासाठी राजेंद्र कस्तुरचंद दोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *