सामाजिक न्यूज

आमदार डॉ विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप

आमदार डॉ विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वाढदिवसा निमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१३/०१/२०२४ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबे ता.पंढरपूर व इंदिरानगर जिल्हा परिषद शाळा चंद्रभागा शेड येथे कडेगाव पलुस चे आमदार डॉ विश्वजीत पतंगराव कदम यांच्या वाढदिवसा निमित्त युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आंबे गावचे माजी डेप्युटी सरपंच विठ्ठल शिंदे, सगण चाचा , डेप्युटी सरपंच निशाल शिंदे ,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे,अशोक शिंदे, श्रीरंग कोळी, संभाजी शिंदे, गणेश कांबळे, हरीश शिंदे, प्रकाश शिंदे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष माऊली कोळी, धाडस सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन शिरगुर, मंगेश कोळी, बाळासाहेब शिंदे ,महेश कोळी, अनिल चौधरी आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *