शेतकरांची ऊस बिले व कामगारांच्या पगार त्वरीत द्या – माऊली‌ जवळेकर

शेतकरांची ऊस बिले व कामगारांच्या पगार
त्वरीत द्या – माऊली‌ जवळेकर

पंढरपूर /नागेश आदापूरे – बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने पाच तारखेला मोहोळ तहसीलवर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिल व कामगारांच्या पगारी साठी बेमुदत धरणे आंदोलन असल्याने यासंदर्भात मोहोळ तहसीलदार जिवन बनसोडे यांनी कारखान्याचे प्रशासन व बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत आम्ही शेतकऱ्याची सर्व देणी पंधरा दिवसाच्या आत देऊ असं कारखानदारांचे म्हणणं आहे परंतु संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठणकावून सांगितले की शेतकऱ्यांची सर्व देणी पाच तारखेच्या आत द्यावी अन्यथा पाच तारखे नंतर बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने मोहोळ तहसीलवर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.

या बैठकीस मोहोळ तहसीलदार जीवन बनसोडे ,भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप व कार्यकारी संचालक शिंदे तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश भोसले व रामदास खराडे, मोहोळ तालुकाध्यक्ष विठ्ठल ढेकळे ,काकासाहेब मुळे पंढरपूर तालुकाध्यक्ष औदुंबर सुतार ,नानासाहेब मुळे ,बाळासाहेब मुळे, सुजित मोटे , प्रकाश भोसले,बालाजी शेळके, तानाजी सोनवले, विकास खराडे, शेखर कोरके, नितीन गावडे, रमेश लंगोटेंसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: