General news

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्यावतीने मकरसंक्रांत उत्सवाबाबत

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूर च्यावतीने मकरसंक्रांत उत्सवाबाबत

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि १३ जानेवारी, २०२४ – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीच्या दिवशी रविवार, दि.१४/०१/२०२४ रोजी श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३.०० ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल तर त्यांनी पहाटे ४.३० ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी ०६.३० वा.पर्यंत दर्शन सुरू करण्यात येईल.

भाविकांच्या सोईच्यादृष्टीने दि.१४/०१/२०२४ रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत करणेत येईल.पदस्पर्श दर्शन पहाटे ०६.०० वा. नंतर सुरू करणेत येईल.

दि.१५/०१/२०२४ रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झालेनंतर श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

तसेच दि.१६/०१/२०२४ रोजी नेहमीप्रमाणे श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा वेळेत करण्यात येणार आहे. दि.१५/०१/२०२४ रोजी मकरसंक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *