राजकीय न्यूज

दिव्यांगांमध्ये विशेष क्षमता असल्याने त्यांना संधी देण्याची दृष्टी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशाला दिली- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन

दिव्यांगांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा पर्पल फेस्टिव्हल गोवा राज्य सरकार चा अभिनव उपक्रम – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 – अपंगांना अपंग न म्हणता त्यांना दिव्यांग म्हंटले पाहिजे. त्यांच्या ठायी विशेष क्षमता दिव्यता असते.दिव्यांगांमधील विशेषता दिव्यता देशाला दाखवून दिव्यांगांना साथ सहानुभूती आणि संधी देण्याची दृष्टी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवली. त्यामुळे देशात दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र सुरू आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या दिव्यांग विभाग आणि गोवा राज्य सरकार संयुक्त विद्यमाने दिव्यांग जनांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा इंटरनॅशनल पर्पल फेस्टिव्हल – 2024 अयोजित करुन एक आदर्श उपक्रम केला आहे.या अभिनव उपक्रमामुळे दिव्यांग जणांच्या कलात्मकतेला त्यांच्या विशेष कौशल्याला जागतिक पातळीचा मंच पर्पल फेस्टिव्हल मुळे उपलब्ध झाला आहे. या उपक्रमाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आपण अभिनंदन करतो असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डी बी ग्राउंड; पणजी ( गोवा) येथे आयोजित इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 चे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ना.रामदास आठवले उदघाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई;क्रीडा मंत्री गोविंद गावडे; भाजप चे गोवा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सदानंद शेठ तानवडे; गोव्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; आमदार प्रवीण अर्लेकर; केदार नाईक; निधी गोयल रिपाइं गोवा राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

या पर्पल फेस्टिव्हल मध्ये अनेक दिव्यांग आणि स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलांनी विविध चित्रकला; शिल्पकला; हस्तकला द्वारे साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शनाला ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन विविध कलाकृतींचे परीक्षण केले देशभरातून आलेल्या विविध दिव्यांग कलाकारांची त्यांनी भेट घेतली. दिव्यांग कलाकारांना ना.रामदास आठवले यांनी प्रोत्साहित केले. एका दिव्यांग कलाकाराने साकारलेले ताज महाल चे लघुशिल्प पाहून ना.रामदास आठवले यांनी त्या शिल्पकृती सोबत आपले छायाचित्रे घेऊन दिव्यांग कलाकारांना अधिक प्रोत्साहित केले. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या सोबत गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *