धार्मिक न्यूज

पंढरपूरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी ची हत्तीवरून मिरवणूक

पंढरपूरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी ची हत्तीवरून मिरवणूक

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता हत्तीवर ग्रंथ ठेवून मोठ्या उत्साहात पार पडली.

चारोधाम यात्रा संकल्प परिपुर्ती गुरुवर्य वै. दत्तात्रय महाराज बडवे यांचे महानिर्वाण त्रितपपुर्ती व गुरुवर्य प्रसाद महाराज बडवे यांचे सेवा त्रितपपुर्ती या निमित्त श्री विठ्ठल मंदिर नदिवेस, मिरज येथील सर्व वारकरी भाविकांच्या वतीने सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक,श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,शंकर महाराज बडवे, बाबासाहेब बडवे,ह.भ.प.विजय पांडुरंग कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सप्ताहाच्या सांगता समारंभा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीची हत्तीवरून मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. प्रसाद महाराज बडवे यांनी आपल्या मस्तकावर श्री ज्ञानेश्वरी ठेवली होती.

सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.उत्तम मिरजकर यांनी केले. सप्ताहात ह.भ.प.बाळासाहेब देहूकर,ह.भ.प.एकनाथ पिंपळनेरकर, ह.भ.प. हरिभाऊ महाराज बोराटे-आजरेकर, ह.भ.प.केशव नामदास,ह.भ.प.चैतन्य वासकर,ह.भ.प.भागवत शिरवळकर यांनी किर्तनसेवा केली.या सोहळ्याला वै.धोंडोपंत दादा फडावरील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सोहळ्यासाठी बाळकृष्ण येसुमाळी, महादेव भोसले, सोपान येसुमाळी, हरिसिंग रजपूत, शिवाजी भोसले,शशिकांत चौगुले, दीपक चंदगुडे,रत्नाकर भोसले,शेषराज पाटील,विश्वास सावंत,गणपती माने, सुलोचना सावंत, सुखदेव पवार, सर्जेराव पवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *