शेळवे भंडीशेगाव रस्ता झाला काटेरी झुडपातुन मुक्त
शेळवे भंडीशेगाव रस्ता झाला काटेरी झुडपातुन मुक्त Shelve Bhandishegaon road became free from thorn bushes
शेळवे / संभाजी वाघुले - शेळवे ता.पंढरपूर येथील शेळवे भंडीशेगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळींनी संपुर्ण रस्ताच झाकाळलेला होता यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले होते.
शेळवे भंडीशेगाव या रस्त्या दरम्यान खेडभाळवणी रोड ,बरड वस्ती रोड व वाडीकुरोली रोड असे अनेक रस्ते जोडलेले आहेत .या रस्त्याच्या व शेळवे भंडीशेगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी काटेरी झुडपे वाढलेली आहेत.या रस्त्यांच्या दोन्ही बाजुची काटेरी झुडपे मागील अनेक वर्षापासुन काढलेलीच नसल्यामुळे वाहतुकीला फार अडचण निर्माण झाली होती.
शेळवे परिसरात शाळा काॅलेज इंजिनीअरिंग काॅलेज असल्याने परिसरातील सर्वच रस्त्यांनी शालेय विद्यार्थी ये जा करत असतात. मागील दोन वर्षापासुन कोरोना प्रार्दुभावामुळे रस्त्यावर रहदारी नव्हती परंतु आता काही दिवसांपासुन कोरोना आटोक्यात आल्यामुळे रस्त्यावरील रहदारी वाढल्याने काटेरी झुडपामुळे व खराब रस्त्यामुळे एक अपघात होऊन त्यात एकाचा हात मोडला होता तसेच अनेक किरकोळ अपघात वारंवार होत असल्याने शेळवे ग्रामपंचायतीने शेळवे - भंडीशेगाव या रस्त्याची काटेरी झुडपे काढण्यास सुरुवात केली आहे.
शेळवे -भंडीशेगाव या रस्त्याच्या दोन्ही बाजुची सावलीची व उपयोगी झाडे लक्ष्मण सावंत व जोतीराम आटकळे या दोन तरुणांनी वाचवली आहेत. तसेच या झाडांना मातीची आळी करुन भविष्यात मोठ्या वृक्षात रुपांतर होईल अशी सोय केली आहे. या झाडांच्या बाजुची काटेरी झुडपे काढुन त्यांना माती लावुन आळी केली आहेत.
शेळवे ग्रामस्थ शालेय विद्यार्थी व या मार्गावरील प्रवाशांतून या सर्वच रस्त्यावरील वाढलेली काटेरी झुडपे तोंडण्याची मागणी होत वारंवार होत होती मात्र आता हे काम राबविण्यात येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे रस्ते हे बाभळींनी वेढलेले असून सतत लहान मोठे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अधिकारी यांनी लक्ष घालून काम करणे आवश्यक आहे.