राज्यात महिला अत्याचार घटनेत वाढ झाली असल्याचे निदर्शनास – ना.डॉ. नीलम गोऱ्हे
राज्यात महिला अत्याचार घटनेत वाढ झाली असल्याचे निदर्शनास – ना.डॉ.नीलम गोऱ्हे Dr. Neelam Gorhe pointed out that the incidence of atrocities against women has increased in the state

महिला अत्याचाराच्या घटनांबाबत ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेऊन महिला अत्याचाराच्या घटना थांबविण्या संदर्भात उपाय योजनाबाबत चर्चा…
मुंबई ,दि.०५ : राज्यात महिला अत्याचार घटनेत वाढ मागील दोन ते तीन दिवसात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.कोळसेवाडी पोलीसस्थानक जि ठाणे,जुन्नर पोलीस स्थानक जि पुणे, बीड पोलीस स्थानक येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी श्री पाटील यांना केली.
त्याचबरोबर पीडित महिलांना मनोधैर्य योजनेतून मदत देण्यात यावी,घटनेतील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.राज्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरा वरील महिला सुरक्षा समिती तात्काळ स्थापन करण्याबाबत सर्व पोलीस प्रशासनास सूचना देणेत आल्या आहेत.याबाबत झालेली कार्यवाहीचा आढावा ही घेणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर आपणास महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या संदर्भात,वाढत्या सायबर गुन्ह्या बाबत, महिलांच्या गुन्ह्यातील बी समरी झालेल्या केसेसचा आढावा बैठक घेण्याची विनंती डॉ.गोऱ्हे यांनी श्री वळसे पाटील यांना केली.

आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री श्री पाटील यांचा सत्कार करून ‘स्त्री पुरुष समानता – पोलीस मार्गदर्शक’ हे नीलमताई गोऱ्हे लिखीत पुस्तक भेट दिले.या पुस्तकाचा उपयोग पोलिसांची संवेदनशीलता वाढविण्यासाठी मदत होईल असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.