माझ्या चारोळ्यांच्या वनातून….

        माझी दृष्टी....

अंकुरात नव्या कोम्बाच्या पाहतो “राम मी”
फुलपाखरांच्या स्वच्छंदी
विहारात अनुभवतो “राम ” मी,
रानफुलांच्या उमलण्यात पाहतो “राम” मी,
मोगरा,जाई जुई प्राजक्तात
अवलोकन करतो “राम मी “
सूर्याच्या प्रथम किरणात पाहतो “राम” मी.
मावळताना क्षितिजावरी अनुभवतो “राम मी’
पौर्णिमेच्या चांदण्यात पाहतो “राम “मी,
अमावश्येच्या शांततेत
अवलोकन करतो “राम मी.
सकळ प्राणीमात्रात वंदितो “राम मी”
सुसंस्कृत माणसांत अन
महात्म्यात पाहतो “राम मी “
“सत्य सेवा अहिंसा परोपकारात
पाहतो “राम मी”
निसर्गात पाना फुलात वृक्षवेली पशू पक्षी
यांच्यात पहातो “राम मी “!!

माझ्या चारोळ्यांच्या वनातून….

१,पाऊस नसेल तेंव्हा दुष्काळ असतो
पाऊस पडतो तेंव्हा महापूर छळतो
सध्या पाऊस असो वा नसो
तो जीवावर उठतो
शेतकऱ्यांना हाती
फक्त नुकसानीचा पंचनामाच पडतो!!

२,सत्तेसाठी कोण केंव्हा
एकत्र येतील सांगता येत नाही
राजकारणात सत्तेची
संधी कोणीही सोडत नाही
कारण जसा मासा पाण्याशिवाय
तसेच राजकारणी सत्तेशिवाय
जगूच शकत नाही “!!

              सुप्रभात 

लोकांचे दोष ,उणीवा, चुका दाखवणे यापेक्षा आपलं आत्मपरीक्षण करून विकार वा दोष असतील तर त्यांची पानगळ करणं हे खूप
अर्थपूर्ण ठरते.

आनंद कोठडीया,जेऊर ता.करमाळा
९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: