national

Share Market : बुलेट ट्रेनप्रमाणे धावतोय हा Railway चा शेअर, २ वर्षांत ६००% पेक्षा अधिक तेजी

सरकारी कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या ​​शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. सोमवारी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांहून अधिक वाढून 218.80 रुपयांवर पोहोचले. रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्सचा हा एक वर्षाचा उच्चांकी स्तर आहे.

शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 203.10 रुपयांवर बंद झाले होते. रेल्वे विकास निगमच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 56.15 रुपये आहे.

2 वर्षात 600% पेक्षा अधिक वाढ

गेल्या 2 वर्षांत रेल विकास निगम लिमिटेडचे (RVNL) शेअर्स 600 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सरकारी कंपनीचे शेअर्स 31 रुपयांवर होते. 15 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 218.80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात, रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्समध्ये 183 टक्क्यांची वाढ झाली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 76.85 रुपयांवर होते. 15 जानेवारी 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स 218.80 रुपयांवर पोहोचले आहेत.

12 रुपयेहून 200 रुपयांपार

रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (Rail Vikas Nigam) ​​शेअर्स गेल्या चार वर्षांत 1600 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स 12.80 रुपयांवर होते. 15 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 218.80 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 5 वर्षांत, रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स 1000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 19.75 रुपयांवरून 218.80 रुपयांपर्यंत वाढले. गेल्या 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेडचे ​​शेअर्स सुमारे 85 टक्क्यांनी वाढले आहेत.

(टीप – यामध्ये शेअर्सच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *