डॉक्टर डे निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूरच्यावतीने जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार

डॉक्टर डे निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर च्यावतीने जनकल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार Doctors of Janakalyan Multispeciality Hospital felicitated as Corona Warrior by Inner City Club of Pulse Pandharpur Chavati on the occasion of Doctor’s Day

पंढरपूर / प्रतिनिधी – डॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूरमधील कोवीड सेंटर जनकल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ.अजित जाधव,डॉ.विशाल फडे, डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.अनिल काळे, डॉ अमृता म्हेत्रे,डॉ.श्रेया जाधव, डॉ.काजल जरे, डॉ.संग्राम किलमिसे, डॉ.दिनेश चौगेले व नर्सिंग स्टाफ यांना कोरोना योध्दा म्हणून सर्टिफिकेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. इनरव्हिलबच्या चार्टर अध्यक्षा सौ.सायली लाड यांचाही वसंतदादा काळे मेडीकल फाउंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आहे.

     यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.संगिता काळे, डॉ.जयश्री शिनगारे, जनकल्याण हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुधीर शिनगारे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सारीका कासार,डॉ.सायली लाड,खजिनदार गौरी गोसावी,नीलीमा गोसावी, नीलीमा शिंदे,स्वाती भगरे, पल्लवी उपाध्ये, जनकल्याण हॉस्पिटलचे व्यवस्थापक सद्दाम मणेरी, आण्णासो डुबल, डॉ.सत्यवान बागल, उपस्थित होते.

डॉ. सुधीर शिनगारे यांनी वसंतदादा काळे यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. दादांच्या विचारांचा वारसा संस्थेचे मार्गदर्शक सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालवित आहोत. कोरोना आजाराचा प्रार्दुभाव सर्वत्र असताना पहिल्या लाटेत पंढरपूर ग्रामीण व शहरातील कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेवून कोरोना रुग्णांसाठी पहिल्यांदा जनकल्याण हॉस्पिटलने सेवा सुरु करुन सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्याचे काम संस्थेचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी केले असल्याचे सांगितले. विविध शासकीय योजनेमधून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.कोवीड हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टर,नर्सिंग व इतर स्टाफ यांनी रुग्णांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे काम केलेले असल्याचे जनकल्याण हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे यांनी सांगितले.

इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ.सारीका कासार यांनी संस्था व जनकल्याण हॉस्पिटलने आज पर्यंत केलेल्या आरोग्य विषयक उपक्रमाची प्रशंसा केली. कोरोना काळामध्ये हॉस्पिटलमधील सर्व स्टाफने रुग्णांची सेवा केल्याबद्रदल त्यांनी आभार मानले. अशा प्रकारच्या आरोग्य विषयक उपक्रमांना सहकार्य करण्याचे त्यांनी अभिवचन दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ.श्रेया जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: