श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार Donors felicitated on behalf of Shri. Vitthal Rukmini Mandir Samiti
दत्तात्रय हरीभाऊ जाधव,मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, देणगी विभाग प्रमुख संजय कोकीळ
पंढरपूर /नागेश आदापूरे - रविवार दि ०४/०७/ २०२१ रोजी पुणे येथील संजय नारायण पवार यांनी श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस ७२८ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा नग २ भेट दिल्या. त्यावेळी संजय नारायण पवार यांचा सत्कार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे हस्ते श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची दैनंदिनी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला . 

    दि.२१/०६/२०२१ जेष्ठ वद्य ११ योगीनी एकादशीनिमीत्त दत्तात्रय हरीभाऊ जाधव रा.पट्टी वडगांव ता.आंबेजोगाई जि.बीड यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रू.१,००,००० / - अक्षरी एक लाख रूपयांची देणगी दिली होती . त्यावेळी दत्तात्रय हरीभाऊ जाधव यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते श्री ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.त्यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,  देणगी विभाग प्रमुख संजय कोकीळ व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: