नूतन आमदार समाधान आवताडे यांचा आज विधिमंडळ सभागृहात प्रवेश

नूतन आमदार समाधान आवताडे यांचा आज विधिमंडळ सभागृहात प्रवेश New MLA Samadhan Avtade enters the Legislative Assembly today
नूतन आमदार समाधान आवताडे यांचा विधिमंडळ सभागृहात प्रवेश
मुंबई, दि.05 /07/2021 - विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम्‌ने सकाळी 11 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

या अधिवेशनात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील रस्ते, वीज, शिक्षण, कृषी व बेरोजगारी अशा व इतर विविध प्रश्नांचा उलगडा करून त्यावर शासनदरबारी आवाज उठविण्या साठी भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर व संतांची भूमी असा परिचय असलेल्या संताचे नगरीतील नूतन आमदार समाधान आवताडे यांनी आज योगिनी एकादशी या मंगलमय दिवशी जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यांना साक्ष ठेवून विधिमंडळ सभागृहात प्रवेश केला.

 आमदार  समाधान आवताडेंचे विधिमंडळ प्रवेशद्वारात आगमन होताच मतदार संघातील जनतेने शाश्वत समाधानाचा सुखद अनुभव घेतला. गेली अनेक वर्षे जनता ज्यांच्या आमदारकीची स्वप्ने पाहत होती ते स्वप्न अखेरीस पूर्णत्वास आल्याने मतदार संघातील माय - बाप जनता वास्तविक विकासाचा आणि धोरणात्मक प्रगतीचा राजदंड यांचा नवा वास्तुपाठ रंगवू लागली आहे.

आमदार समाधान आवताडे यांनी आमदारकीच्या कारकिर्दीची सुरवात करताना विधिमंडळ हे एक मंदिर आहे, विधानसभा सभागृहातील आसन बाक हे त्या मंदिरातील गाभारा आहे आणि ज्या जनतेने सदर मंदिराकडे व गाभाऱ्याकडे जाण्याची अनमोल संधी उपलब्ध करून ती जनता म्हणजे देवता होय. त्याच देवतारूपी जनतेची सेवा करण्याची आपण खूणगाठ बांधून सभागृहात पाय ठेवला असे माझ्या मनाला वाटत आहे.. आणि हे सत्य आहे.

 आमदार आदरणीय श्री.दादांजवळ काम करत असताना त्यांची मतदार संघाविषयी असलेली तळमळ आणि आत्मियता ही नेहमीच अनुभवलेली आहे. त्यामुळे माननीय आमदार साहेब त्यांच्या मनातील मतदारसंघातील विकासाचे व्हिजन राबवून एक आदर्श आणि लोकाभिमुख असलेला मतदार संघ बनवतील यात तिळमात्र ही शंका नाही.

आज आमचे दैवत आमदार महोदय आदरणीय श्री. दादा सभागृहात जातानाचे फोटो पाहुन ऊर अगदी भरुन आला. पण निसर्गनियमा अनुषंगाने डोळ्यातून आनंदाअश्रू ही आवरू शकलो नाही..
दादा मला आपला सार्थ आभिमान आहे……….!!! अशा शब्दांत आपल्या भावना आमदार समाधान आवताडे यांचे स्वीय सहाय्यक श्री.बळवंतराव यांनी व्यक्त केल्या.

अशाच भावना जनतेत असून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार समाधान आवताडे प्रयत्नशील राहतील आणि सर्वांसाठी सतत उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण सर्वसामान्यांना संपर्क साधता यावा ही भावना मनात असते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: