लायन्स क्लब ऑफ पंढरपूर च्यावतीने डॉक्टर्स डे, सी.ए.डे व फार्मर डे साजरा

लायन्स क्लब ऑफ पंढरपूर च्यावतीने डॉक्टर्स डे, सी.ए.डे व फार्मर डे साजरा Lions Club of Pandharpur celebrates Doctor’s Day, CA Day and Farmer’s Day

   सेवानिवृत्त पंढरपूर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे यांना कोव्हीड योद्धा म्हणुन सन्मानीत करण्यात आले.   

     लायन्स क्लब ऑफ पंढरपूर च्यावतीने

डॉक्टर्स डे, सी.ए.डे व फार्मर डे मनोदय हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला.
पंढरपुरातील वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे यांनी त्यांच्या पुर्ण कार्यकाला मध्ये उत्तम सेवा बजावली विषेषतः कोरोनाच्या कालावधी मध्येही स्वयंस्फुतीने चांगली सेवा बजावल्याबद्दल त्यांना कोव्हीड योद्धा म्हणुन गौरवण्यात आले तसेच सि.ए.क्षेत्रामध्ये चांगली सेवा बजावत असल्याने सी.ए.रोहन कोठाडीया व सी ए अतुल कौलवार यांना सन्मानित करण्यात आले. शेती क्षेत्रामध्ये अत्याधुनिक शेती करुन चांगली सेवा बजावत असल्याने शेतकरी नितीन परिचारक व आढिवचे शेतकरी मोहन चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रम घेण्यात आला.

यापुढेही पंढरपूरातील नागरिकांच्या सेवेचे कर्तव्य बजावण्याऱ्या नागरिकांना, प्रतिनिधींना आम्ही सन्मानित करणार आहे – लायन्स अध्यक्ष विवेक परदेशी

    सदर कार्यक्रमास अध्यक्ष विवेक परदेशी, रा.पा.कटेकर, डॉ ऋजुता उत्पात, ईम्रान मुल्ला, राजेंद्र गुप्ता,सौ सिमाताई गुप्ता, सुरेखाताई कुलकर्णी, शकिलभाई सौदागर, सौ.फिरोजा सौदागर, नारायण उत्पात,ओंकार बसवंती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक परदेशी यांनी केले. आभार सि.ए. अतुल कौलवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: