आज रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात आंदोलन
आज रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात आंदोलन Today, Republican Party’s movement in Azad Maidan – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale उपस्थित राहणार
मुंबई दि. 06/07/2021 – महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर आज मंगळवार दि.6 जुलै रोजी आझाद मैदानात पदोन्नती मधील आरक्षण;मुस्लिम समाजाला आरक्षण; बुलडाणा जिल्ह्यातील चितोडा गावात झालेला दलित कुटुंबावरील हल्याचा निषेध राज्यातील वाढते दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन अयोजित करण्यात आले आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती जमातींना आणि इतर मागास वर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे , मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा कायम पाठिंबा असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकलेच पाहिजे. जोपर्यंत ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवाव्यात. तसेच मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे . बुलडाणा जिल्हातील खामगाव तालुक्यात चितोडा गावातील हिवराळे या दलित कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करुन राज्यात वाढत असलेले दलित अत्याचार रोखण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आज दि.6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती गौतम सोनवणे यांनी दिली आहे.