युगंधर संघटनेचे एमपीएससी परीक्षा संदर्भात पुणे सोलापूर वर रास्ता रोको आंदोलन
युगंधर संघटनेचे एमपीएससी परीक्षा संदर्भात पुणे सोलापूर वर रास्ता रोको आंदोलन Rasta Rocco agitation on Pune Solapur regarding MPSC examination of Yugandhar Association

मोहोळ, दि.5 /07/2021 – गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा वारंवार रद्द करण्यात येत आहे ,नवीन जागेचे जाहिरात प्रसिद्ध न केल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करता येत नाही, गेले दोन वर्ष परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयाची पात्रता अट वाढ व्हावी जेणेकरून ते विद्यार्थी त्यांच्या अधिकारी होण्यापासून वंचित राहू नयेत , जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या नियुक्त्या देखील महाराष्ट्र सरकारने प्रलंबित ठेवलेल्या आहेत. या सर्व गोष्टीला महाराष्ट्र शासनाने तितकंसं गांभीर्याने न घेतल्यामुळे काल एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये स्वप्नील लोणकर नावाच्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली. सरकारच्या या धोरणा मुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे आणि त्यातूनच हा बळी गेलेला आहे म्हणून शासनाने या संदर्भातला आपली भूमिका या अधिवेशनात स्पष्ट करायला हवी अन्यथा लांबोटी येथे पुणे सोलापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा युगंधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुंड यांनी दिला आहे.
यावेळी अनिल पाटील ,गणेश मोरे ,मयूर जावळे, युवराज पाटील, बाबा डोईफोडे, प्रमोद आठवले, सोमनाथ देवकाते, अभिजीत नेटके आदी उपस्थित होते.