राजकीय न्यूज

आपल्या असंख्य समर्थकांसह अनेक नेते करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश- संतोष पवार

तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे आपल्या असंख्य समर्थकांसह करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश- संतोष पवार

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात सोलापूर महापालिकेतील गटनेते तौफिक शेख ,गटनेते आनंद चंदनशिवे यांची राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत सोलापूर शहरातील सामाजिक सांस्कृतिक आणि विकासात्मक या विषयावर चर्चा झाली. गटनेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर शहरातील रमाई घरकुल योजना,दुहेरी पाईपलाईन,सोलापूरची विमानसेवा अशा विविध विकासासंदर्भात चर्चा केली.

गटनेते तौफिक शेख यांनी सोलापूर शहरातील विकास त्याचबरोबर अल्पसंख्यांकांची सुरक्षा असे अनेक प्रश्न मांडले त्याची अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .याच बैठकीत सोलापूर शहरातील राजकीय विषयावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे यांच्या प्रवेशा संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात मोठा मेळावा घेऊन या नेत्यांचा आपल्या हजारो समर्थकांसह प्रवेश होणार असल्याचे सांगितले .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही नेत्याना सोलापूर शहराच्या विकासासाठी ताकत देण्याचा शब्द दिला.तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी मध्ये आल्यास एक सामाजिक समीकरण तयार होऊन पक्षाला त्याचा निश्चित फायदा होईल असे मत उमेश पाटील यानी मांडले.

एक आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा आणि दुसरा अल्पसंख्यांक समाजातील लोकप्रिय चेहरा पक्षात आल्याने पक्ष मजबूत तर होईलच त्याहीपुढे येणार्या लोकसभा विधानसभा आणि महापालिकेला चांगल्या मतामध्ये रूपांतर होईल असे मत शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले .

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी आदनान शेख राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेवक गणेश पुजारी ,इरफान शेख ,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम, विशाल बंगाळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *