कुर्डुवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रा.रवि सुरवसे

कुर्डुवाडी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रा.रवि सुरवसे Prof. Ravi Survase as the President of Kurduwadi Rotary Club
 कुर्डुवाडी/ राहुल धोका - कुर्डुवाडी परिसरात समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ कुर्डुवाडी या संघटनेच्या अध्यक्षपदी प्राचार्य रवी मगन सुरवसे यांची तर सचिवपदी डॉ. सचिन गोडसे यांची निवड झाली आहे . ही निवड २०२१- २२ या वर्षांसाठी करण्यात आली आहे.

रोटरी क्लब कुर्डुवाडीची स्थापना २००६ मध्ये झाली असून क्लबला सामाजिक उपक्रमांचा मोठा वारसा आहे.कुर्डुवाडी क्लबचे डॉ.रवींद्र बोबडे, डॉ. हर्षद शहा आणि नागनाथ कुबेर यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाली आहे .

रोटरी क्लब ऑफ कुर्डुवाडी या संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य रवी सुरवसे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की,मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: