राजकीय न्यूज

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर तिळगुळ वाटप व ऊस तोडणी महिला मजुरांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर तिळगुळ वाटप व ऊस तोडणी महिला मजुरांना साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न

भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मकर संक्राती निमित् आयोजित स्नेह मेळाव्याप्रसंगी चेअरमन कल्याणराव काळे यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकरी, वाहन मालक पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार व हितचिंतक यांचेशी सुसंवाद साधत तिळगुळ देवुन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कारखान्याकडे ऊस तोडणी करणारे कष्टकरी मजुर महिलांची मकर संक्रांत केवळ तिळगुळ वाटुन गोड न करता तिळ गुळाबरोबर साडी वाटप कारखान्याच्या संचालिका मालनबाई काळे, सौ.संगिता देठे, सौ.उषाताई माने यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी स्वरांजली प्रस्तुत सदाबहार हिंदी-मराठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुप्रभात मित्र मंडळाचेवतीने चेअरमन कल्याणराव काळे यांचा सत्कार अध्यक्ष बापुसाहेब देशमुख व सर्व सदस्य यांचे हस्ते करण्यात आला .याप्रसंगी युवा नेते समाधान काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी श्री.विठठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके,माजी संचालक युवराज पाटील, श्री विठठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील,सिताराम महाराज साखर कारखाना माजी चेअरमन गणेश ठिगळे,यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार,व्हा.चेअरमन सादीक मुलाणी, सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर व संचालक गोरख जाधव, मोहन नागटिळक, आण्णा शिंदे, युवराज दगडे, राजाराम पाटील, संतोष भोसले, जयसिंह देशमुख, अरुण नलवडे, परमेश्वर लामकाने, दिनकर कदम, सुनिल पाटील,अमोल माने, योगेश ताड,राजेंद्र शिंदे,राजेंद्र जाधव, संचालक भानुदास सावंत,देवानंद गुंड- पाटील,संग्राम गायकवाड, पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक प्रशांत शिंदे, सतिश शिंदे, संदीप पाटील,राहूल पाटील,समीर कोळी,अमर सुर्यवंशी,शिवाजी धोत्रे, सुरेश देठे,बाळासाहेब आसबे, ॲड संदीप रणवरे, महादेव सुर्यवंशी,उत्तम नाईकनवरे,राजाभाऊ माने,पांडूरंग नाईकनवरे, सुभाष हुंगे-पाटील, बाळासाहेब यलमार,चंद्रकांत बागल, मोहन घोलप,नंदकुमार उपासे, भारत गाजरे, अर्जुन जाधव,व्यवस्थापक कैलास शिर्के यांचेसह प्रतिभादेवी व यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे सर्व संचालक, सुप्रभात मित्र मंडळाचे सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद,कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतुकदार, उपस्थित होते.

अतिथींचे स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *