कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी केला हा अभिनव उपक्रम

सायबर तक्रारींकरीता 8412841100 हेल्पलाईन नंबरची सुविधा सुरु ! गहाळ झालेले 40 मोबाईल शोधण्यात यश Kolhapur Helpline number facility for cyber complaints started 8412841100! Success in finding 40 missing mobiles

कोल्हापूर – नागरिकांना त्यांचेबाबतीत घडलेल्या सायबर गुन्हयांसंबधी ऐनवेळी नेमके काय करावे हे कळत नाही . काहीवेळा त्यांची फसवणुक झाली म्हणून ते संबधीत कंपन्यांचे गुगलवरुन कॉलसेंटर / कस्टमर केअरचा नंबर शोधुन तक्रार करतात परंतु त्यातही फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत.अशा सायबर फ्रॉड / गुन्हे यांची तक्रार सुलभतेने संबधीत पोलीस ठाणेस देता यावी . ऑनलाईन फ्रॉडमधील तक्रादाराचे बँक खाते रिकामे होण्यापासून किंवा इतर हानी टाळण्या साठी तसेच पोलीस ठाणेस अशा तक्रारी देण्यास गेल्यानंतर तांत्रिक प्रक्रिया करणेकरीता स्थानिक पोलीस ठाणे व तक्रादार यांचेत समन्वय रहावा याकरीता कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांचे अभिनव संकल्पनेतून सायबर तक्रारींकरीता 8412841100 हा मोबाईल क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे . नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की , त्यांचेबाबतीत सायबर फ्रॉड झाल्यास संबधीत पोलीस ठाणेबरोबर वरील नंबरवर संपर्क करावा.

  त्याचप्रमाणे मागील वर्षभरामध्ये ज्या लोकांचे स्मार्टफोन गहाळ झाले होते असे विविध कंपन्यांचे 40 स्मार्टफोन्स शोधण्यात सायबर पोलीस ठाणेस यश मिळाले असून त्यापैकी 10 स्मार्टफोन्स मालकांचा शोध घेवून त्यांना जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांचे हस्ते संबंधीतांना सुपूर्द करण्यात आले . जनसामान्यांना पोलीसांमध्ये आपली तक्रार अधिक सुलभतेने देता यावी त्याचप्रमाणे लोकाभिमुख पोलीसींगची अंमल बजावणी प्रभावी व्हावी याकरीता कोल्हापूर पोलीस दल हायटेक होण्याचे मार्गावर असून त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आता नागरिकांसाठी ऑनलाईन स्वरुपात - इन्स्टाग्रामवर - kolhapurpolice , फेसबुकवर - Kolhapur Police आणि ट्विटरवर @KOLHAPUR_POLICE असे सोशल मिडीयावर उपलब्ध असून नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलास फॉलो करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.वरीलप्रमाणे सामान्य नागरिक सोशल मिडीयाचे माध्यमातून देखील कोल्हापूर पोलीसांशी समन्वय साधु शकतात. 

   सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटचे हँडलींग करीता सायबर पोलीस ठाणेकडून विशेष पथकाची निर्मीती करण्यात येत आहे.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: