national

जैन मंदिरात रामभक्तांसाठी भंडारा सुरू

जैन मंदिरात रामभक्तांसाठी भंडारा सुरू

प्राणप्रतिष्ठा निमित्त वात्सल्य मेजवानीचे आयोजन

अयोध्या /ज्ञानप्रवाह न्यूज – प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमांतर्गत जैन समाजातर्फे श्री भगवान ऋषभदेव जन्मभूमी दिगंबर जैन मंदिर रायगंज येथे १५ जानेवारी ते २४ जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते 4 या वेळेत भंडारा आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व प्रकारचे भाविक सहभागी होणार आहेत. या केंद्रात सुमारे 2000 ते 5000 भाविकांच्या भोजनाची व्यवस्था आहे.अनेक प्रांतातून,शहरातून,खेड्यातून लोक यानिमित्ताने येत आहेत.राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये या कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्साह दिसून येत असून त्यात सर्व पंथाचे लोक उत्साहाने येत आहेत.

भगवान ऋषभदेव जन्मभूमी दिगंबर जैन मंदिर बडा पुतला अयोध्या तीर्थ समितीचे मंत्री श्री विजय कुमार यांनी सांगितले की, समितीने दररोज 5000 लोकांसाठी पुरी, हलवा,भात, करी इत्यादी गरम जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.रायगंज दिगंबर जैन मंदिरात पीठाधीश स्वस्तिश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी आणि परमपूज्य गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी आर्यिका चंदनामती माताजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सुरू आहे.समितीच्या सहा पदाधिकाऱ्यांना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले असून ते 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.जैन समाजाच्यावतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.या मंगल कार्यक्रमात अनेक प्रांतातील जैन भाविक सहभागी होत असल्याची माहिती रोज मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *