पंढरपूर तहसिल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपूर तहसिल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन Organizing blood donation camp at Pandharpur tehsil office
पंढरपूर ,07/07/2021 - कोरोनाच्या संकट काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने तहसिल कार्यालय , पंढरपूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी,दुय्यम निबंधक कार्यालय, पंढरपूर आणि पंढरपूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील , सर्व सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार , सेतू महा ई सेवा केंद्र चालक ,सर्व स्टॅम्प व्हेंडर व दस्त लेखनिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०९/०७/२०२१ शुक्रवार रोजी रायगड भवन, तहसिल कार्यालयाचे मागे येथे सकाळी ०९/०० वाजले पासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे . तरी सर्व कर्मचारी व पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान शिबीरात उपस्थित रहावे असे आवाहन सुशीलकुमार बेल्हेकर तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी , पंढरपूर यांनी केले आहे. 

सुशीलकुमार बेल्हेकर तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी,पंढरपूर यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी जपत पंढरपूर तहसिल येथे ‘रक्तदान’ शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना संसर्गाच्या कालावधीत रक्तपेढींना मोठ्या प्रमाणत रक्ताचा तुटवडा भासत होता. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी जास्ती जास्त. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे, आवाहन तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: