sports

अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूलच्या खेळांडूना उत्कृष्ठ खेळाडूंचा सन्मान

अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूलच्या खेळांडूना उत्कृष्ठ खेळाडूंचा सन्मान

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज:- यतिमखाना व मदरसा अंजुमन खैरूल इस्लाम ट्रस्ट मुंबई -०४ यांच्यामार्फत मैदानी स्पर्धेचे आयोजन मुंबई येथे युनिवर्सिटी मैदानावर आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे सचिव हनी अहमद फरीद्‌साहेब ,चेअरमन निसार पटेल, हनीफ लाकडावाला, महिबूब पटेल आदींच्या उपस्थित करण्यात आले.

या मैदानी स्पर्धेमध्ये अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थीनी – विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.

यामध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात कु.तेहरिन समीर नाइकवाडी व मुलांमध्ये कु इस्लाम अनिस खान अनिस खान, 17 वर्षाखालील मुलीच्या वयोगटात कु फिजा अहमद मेमन या सर्वांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून ट्राॅफी व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले.

या सर्व यशस्वी खेळांडूना क्रीडाशिक्षक सर्फराज अफसर बेदरेकर सर, जुनैद गुलाम हुसेन बागबान यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापिका कु. फरहिनअंजुम रियाज शेख यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *