न्यूज ऑन एअर रेडिओ लाइव स्ट्रीमने जागतिक क्रमवारीत वरचा टप्पा गाठला
जर्मनी आणि कुवेत यांचा अव्वल 10 मध्ये समावेश,एआयर न्यूज 24X7 ने वरचा टप्पा गाठला
नवी दिल्ली,PIB Mumbai,7 जुलै 2021-
न्यूज ऑन एअर या अप्लिकेशनवर ऑल इंडिया रेडिओचे थेट प्रसारण जेथे सर्वाधिक लोकप्रिय आहे, अशा जगातील अव्वल क्रमवारीत असणाऱ्या देशांमध्ये (भारत वगळता), फिजीने पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे तर सौदी अरेबियाने पुन्हा पहिल्या दहा क्रमांकांमध्ये पुनरागमन केले आहे. कुवेत आणि जर्मनी यांचा समावेश नव्यानेच होत आहे, तर फ्रान्स आणि न्यूझिलंड यांनी पहिल्या दहा मधील आपले स्थान गमावले आहे. अमेरिका सातत्याने पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑल इंडिया रेडिओची (आकाशवाणी) तेलगू आणि तमिळ थेट प्रसारण सेवा (लाइव्ह स्ट्रीम सर्विसेस) अमेरिकेमध्ये लोकप्रिय आहे तर आकाशवाणीची पंजाबी सेवा युनायटेड किंग्डम मध्ये लोकप्रिय आहे.
जागतिक पातळीवर आकाशवाणी प्रसारणाच्या क्रमावारीत (भारत वगळता) झालेल्या मोठ्या बदलांमध्ये, एअर न्यूज 24X7 ने सात वरून सहावा क्रमांक मिळविला आहे, तर एअर तामिळ सहा वरून दहाव्या क्रमांकावर आले आहे.
प्रसारभारतीच्या अधिकृत असलेल्या न्यूज ऑन एअर या अप्लिकेशनवरून ऑल इंडिया रेडिओच्या 240 पेक्षा अधिक प्रसारण सेवा थेट प्रसारित केल्या जातात.न्यूज ऑन एअर अप्लिकेशनवरील ऑल इंडिया रेडिओ प्रसारण सेवेचा श्रोतृवर्ग केवळ भारतातच नव्हे तर जगभरात 85 पेक्षा अधिक देश आणि 8000 शहरांमधून खूप मोठ्या संख्येने आहे.
भारताव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये न्यूज ऑन एअर या अप्लिकेशनवरून ऑल इंडिया रेडिओचे थेट प्रसारण सर्वाधिक लोकप्रिय आहे.